खोपा
*इवल्या चोचीने तीनं खोपा इनला,*
*पिलासाठी तीनं जीव झाडाला टांगला*,
*पंखात विजेचे बळ भर सानुल्या,*
*विहारण्या खुणावते नभांगण तुला!*
*सुनिता अनभुले, मुंबई*
नजर
तिची नजरभेट होती चोरटी,
अर्ध उन्मलित उष्ण श्वासाची,
लाली खुणावी गुलाबी अधराची
सदाची हातोटी वाट पाहण्याची!
सुनिता पांडुरंग अनभुले, मुंबई
नजर
तिची नजरभेट होती चोरटी,
अर्ध उन्मलित उष्ण श्वासाची,
लाली खुणावी गुलाबी अधराची
सदाची हातोटी वाट पाहण्याची!
सुनिता पांडुरंग अनभुले, मुंबई
सुबकता
कोरीवकाम दगडाचे
आखीवरेखीव नटलेले,
सुंदरता असे हातांची,
सुबकतेने घडलेले ।।
सुनिता अनभुले
गाव
मनातला गाव,
आनंदाचा अभाव,
अंतरातला भाव,
कृतीतुन जागव ।।
सुनिता अनभुले
सुबकता
कोरीवकाम दगडाचे
आखीवरेखीव नटलेले,
सुंदरता असे हातांची,
सुबकतेने घडलेले ।।
सुनिता अनभुले
गजर.....
गजर किर्तनाचा,
सावळ्या विठूचा,
जमला गोतावळा,
मेळावा भक्तीचा ।।
सुनिता पांडुरंग अनभुले.
नजर
तिची नजरभेट होती चोरटी,
अर्ध उन्मलित उष्ण श्वासाची,
लाली खुणावी गुलाबी अधराची
सदाची हातोटी वाट पाहण्याची!!
सुनिता पांडुरंग अनभुले मुंबई
ओघळले मोती......
जरी नेत्री ओघळले मोती,
तरी नको बाळगू भीती,
तुझ्या सौंदर्याची प्रचिती,
अनिमिष नेत्रांनी पाहू किती,
मनाची अशी झाली स्थिती,
बोल सखे तुज सांगू किती,
करतो तुजवर अपार प्रीती,
कधी मिळेल प्रेमाचीपावती
सुनिता अनभुले, मुंबई