"उंच उडण्याची हिंमत
त्यांच्यातच असते ज्यांना
खाली पडण्याची भीती नसते"
-वैभव चौधरी
"जिंकणं खूप सोप्प असतं
कठीण असतं ते जिंकण्याचा
सराव करणं"
-वैभव चौधरी
बावऱ्या राधेचा साथी श्रीकृष्ण
रथाचा उत्तम सारथी श्रीकृष्ण
राजसुयचा मानकरी श्रीकृष्ण
पांडवांचा कैवारी श्रीकृष्ण
-वैभव चौधरी
आजही तिचा तसाच चेहरा होता.
कोण जाणे खोटा की खरा होता.
सोडून गेली मज ती अधांतरावर
अधांतरी बहुतेक तिचा पहारा होता.
-वैभव दि.चौधरी
भारताची शान तिरंगा
शूरवीरांचा मान तिरंगा
देशभक्ती मनात रुजवी
देशाचा अभिमान तिरंगा
-वैभव चौधरी
आज अचानक काय घडलं
मला तिचं स्वप्न पडलं...
स्वप्नात नवी नीत भासली
स्मितहास्याची लाली दिसली...
-वैभव चौधरी
बागेत फुले खूप होती
पण मोगरा आवडला होता
कारण तिनेही एकदा
मोगऱ्याचा हट्ट केला होता...
परिजातकाहून सुंदर
तुझं रूप गं साजणी
जीव गुंतला तुझ्यात
आस लागली मनी