तु माझी आई
मी बाळ तान्हे,
तू जवळी असता
जग लागे उणे.
सिमेवरती देश रक्षिण्या
लढतो माझा तो वीर
तयामंदी दिसतो मला
क्रांतीकारक थोर.
का रूसला मेघराजा ?
तु लवकर ये ना,
वाट पाहतो चातकासारखी
आनंद आम्हाला दे ना.
का रूसला मेघराजा ?
आमचा जातो प्राण,
येऊन लवकर तु
पिकांना दे वरदान.