Suvarna Pandharinath Walke
Literary Lieutenant
24
Posts
19
Followers
2
Following

None

Share with friends
Earned badges
See all

क्षेत्र कोणतेही असो ज्या ठिकाणी एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे काम करत असते ना त्या ठिकाणी त्याला विरोध करणारे बरेच विराेधी तयार हाेत असतात हे त्रिकालबाधित सत्य आहे ... स्वार्थाच्या या जगामध्ये, फक्त अर्थालाच किंमत आहे.. सध्याच्या या युगात प्रामाणिकतेला मरण आहे, स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांचं घर भरण आहे.. कटू पण सत्य🙏🏻🙏🏻 माझी लेखणी🖋🖋📒

जपूनी वापरूया आपण पाणी, उन्हाळ्यामध्ये सुध्दा ऐकू येईल समृद्धीची गाणी - कु. सुवर्णा वाळके

आयुष्यात चढ येतच राहतात, फक्त आपण वरचढ व्हायचे नाही, त्याचबरोबर उतार ठरलेलाच असतो, फक्त माघार घ्यायची नाही.. - कु. सुवर्णा वाळके..

प्रत्येक वर्षी कॅलेंडरचे पान बदलते, ते काय नवीन वर्ष असते, ज्या दिवशी आपल्या मनात नवीन सकारात्मक विचार येतील आणि त्यानुसार कृती घडेल तोच खरा आपल्यासाठी नवीन दिवस व नवीन वर्ष असू शकते.. -कु. सुवर्णा वाळके

तूच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार, मेहनत करूनी दे जीवनाला आकार, तरच मिळेल पोटाला भाकर, नाहीतर स्वाभिमान विसरुनी बनावे लागेल दुसऱ्यांचा चाकर.. -कु. सुवर्णा वाळके

प्रेमळ मनाची माझी माय, लालभडक तापलेल्या दुधावरची साय, संसारासाठी अपार उपसूनी कष्ट, राबराब राबूनी खावे लागते उष्ट..

प्रयत्न करून जो व्यक्ती पडतो, तो पडत नसून परिपूर्ण घडतो, आयुष्याशी अनेक अनुभव जोडतो, अन् महाकाय संकटाला धैर्याने तोडतो... - कु. सुवर्णा वाळके


Feed

Library

Write

Notification
Profile