पाणी म्हणजे जीवन,
जपून वापरा पाणी
नाहीतर भटकावे लागेल वणवण.
- अश्विनी गुंजाळ
सगळीकडे पसरतो आहे कोरोना
आता वाटते आहे जंगलच बरे ना
- अश्र्विनी गुंजाळ
आनंदाचे दोन क्षण
खुलवून जाते मन
- अश्विनी गुंजाळ
मदतीचा हात नेहमी असावा पुढे
मग संकटांना कोण घाबरेल गडे
- अश्विनी गुंजाळ
प्रश्नांची उत्तरे शोधाया कुठे कुठे भटकली
तिला न समजले उत्तरे प्रश्नातच दडलेली
- अश्विनी गुंजाळ
सागराच्या पातळीचा थांग पत्ता ना कुणाला
वर वर दिसणारे सौंदर्य भुलवीते आपल्याला
- अश्विनी गुंजाळ
पुस्तकातून मिळते बुद्धीचे ज्ञान
दूर होते माणसातले अज्ञान
- अश्विनी गुंजाळ
एकीकडे मुलींच्या पाठीवर कौतुकाची थाप
तर दुसरीकडे मात्र होत आहे गर्भहत्येचं पाप
- अश्विनी गुंजाळ
एकीकडे मुलींच्या पाठीवर कौतुकाची थाप
तर दुसरीकडे मात्र होत आहे गर्भहत्येचं पाप
- अश्विनी गुंजाळ