स्वप्न श्रीमंतीचे पडत होते...
नाव माझे दारिद्र्य रेषेत होते..
किती रचना करतोय मी
' एकाच विषयावर '
किती फसत जातोय मी
' एकाच विषयावर '
झाली तिथूनच
सुरुवात...
जिथून खाडाखोड
झाली..
नको पाऊलांना दाखवू तू
दिशा मित्रा..
इथे आपले आपलेच होत नाहीत
तुझ्यावर कसा विश्वास
ठेवू मित्रा..