तारूण्यातील बेछूट वर्तन वृद्धापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज आहे उतार वयात ते सहव्याज फेडावे लागते ps kalyan
धेय्य शून्य जीवन म्हणजे दगडाचा गोलगरगरीत गोटा असते. उतारावरून घरंगळत आल्यावर कुठे पोहचेल, हे त्यालाही माहीत नसते. . ps kalyan
वृद्धाश्रमात दिसत नाही शेतकर्याचे बाप नि माय व्यवहारात अडाणी होते म्हणून पाळली भाकड गाय. . प्रभाकर पवार
जीवन संघर्ष कुणाला चुकला ?, येथे जो कुणी जन्मला आहे त्याला. कधी चढ कधी ठरलेला उतार, आहेच मानवाला अपरंपार. अोळखायला आपले परके, ठेवायला लागता येथे नेहमी डोळे उघडे.