तेजाचे प्रतीक
सण दिपावली
देते लख्ख प्रकाश
नात्यांची प्रेमळ सावली
दिपावली ची सुरुवात
वसुबारस आज...
सर्वत्र दिसतो दिपमाळेचा
दैदिप्यमान साज
पणती त्यात तेल आणि वात
देते मिणमिणता प्रकाश...
असंख्य पणत्या येती एकत्र
जश्या चांदण्या बहरती आकाशात...
आला सण दिपावली चा
सर्वत्र कामाची घाईच घाई...
चहूकडे पसरतो प्रकाश
दारी कंदिलाची रोशनाई...
उंच उंच आकाशात
विहारतात पक्षी...
बघतांना वाटते जनू
फिरणारी नक्षी...
रम्य सुदंरता घेऊन
आली आजची पहाट....
धूसर पांढऱ्या धुक्यांणी
सजू लागली वाट....
शरीर ठेवावे
सतत कामात...
मन हे असावे
नव कल्पनांच्या शोधात...
येते दु:ख काय नाही माझ्या जवळ हेच शोधत राहिल्याने
मिळते समाधान जे आहे त्यात चांगले शोधून आनंदी राहिल्याने
शिवरायाचे पराक्रम
आहेतच मोठ-मोठे...
सोबतीला होते मावळे
वर्णन करती गाऊन पोवाडे...