ए आई ....... तु भासे ठाई ठाई... तू गेलीस इतक्या घाई घाई... इतरांच्या आईसारखी तू का ग आज माझ्या सोबत नाही... काय असा झाला गुन्हा... का अशी सोडुन गेलीस आम्हा... तू आमची जान होतीस ग आई... ए आई तू भासे ठाई ठाई.... जीवनाच्या पानावर का अशी अर्ध्यातच सोडली ग शाई.... तुझ्या लेकरांची तुला हाक का ग येत नाही....? इतरांचे मातृत्व बघून तु भासे त्यांच्यातही आई..... ए आई तू भासे ठाई ठाई... महेश कामडी