अहंकार दुःखाजवळ फिरकत नाही.
सुखामुळे अहंकाराचा जन्म होतो.
मग ते सुख कोणतेही असो विद्वत्ता,पैसा ,सत्ता व प्रतिष्ठा....
ज्ञानाच्या ही काही अवस्था असतात.
ज्ञान जेव्हा बाल्यावस्थेत असते तेव्हा ते हट्टी आणि आग्रही असते,
ज्ञान जेव्हा युवावस्थेत येते तेव्हा धैर्य आणि सामर्थ्यवान बनते तर ज्ञान जेव्हा वृद्धावस्थेकडे प्रवास करत असते तेव्हा करुणभाव, प्रेम,भक्तिरस आपल्यात झिरपत जातो...
आणि या ज्ञानाची अंतिम अवस्था म्हणजे चिरशांती नि मुक्तियोग...
राग उत्प्रेरकाचे कार्य करतो .
याच्या केवळ असण्याने वादप्रक्रियेचा
वेग वाढतो.
पैसा जीवनाचे साध्य नसून साधन आहे .
म्हणूनच तो कितीही मिळवला तरी आपण
सिद्ध होत नाही .
प्रवाहात बुडून जाण्यापेक्षा
किनाऱ्यावर तठस्थपणे उभारून
जगणे अधिक सुलभ होते
प्रवाहात बुडून जाण्यापेक्षा
किनाऱ्यावर तठस्थपणे उभारून
जगणे जास्त चांगले कळते.
लोकं आनंदात ही डावपेच खेळतात
आम्ही डावपेचामध्येही आनंदी राहतो .
प्रत्येकास कौशल्यपूर्वक व्यक्त होण्याचा प्रभावी राजमार्ग म्हणजे
सोशल मीडिया...
समतोल साधून वेग मिळेपर्यंत
यशापयशाची गाडी डगमगते,
एकदा प्रयत्न गतिमान झाले
की स्थैर्य आपल्या पुढ्यात उभे राहते.