मैत्रीत बंधन नसते नात्यांचे स्पंदने असतात आपलेपणाचे करायला मदत सारे असतील वेळेप्रसंगी मागे सारून स्वतःला, मित्रच मोठे करतात मित्राला... *पंकज मधुकर बडगुजर* १५/१०/२०२२ सायं ५.३९ वा.
कोणी झळकतय, कोणी चमकतय उंचीच्या शिखरावर क्षणार्धात आलेल्या यशाने. खऱ्या प्रसिद्धीचा खरा आनंद मिळतो कष्टाच्या जोराने नाकी कोणाच्या आसर्याने तो दरवळतो फक्त आणि फक्त दिर्घाश्रमात गाळलेल्या घामाने...... पंकज मधुकर बडगुजर ०३/१२/२०२१
दुःख आपल्यांनी दिलेल्या वेदनेने नाही होत. आपलं मानून परकं केलेल्यांमुळे होतं पंकज मधुकर बडगुजर 16/12/21
छटा रंगांच्या बखुबी जाणतो आम्ही प्रदर्शन सुखद दुःखाचे ही मांडतो आम्ही आम्ही आपल्या विश्वातले अनंत मुखवटे चेहर्या मागं ही चेहरा आमचा, सांगा पाहून ओळखणार कसे.. पंकज मधुकर बडगुजर. १६/०९/२०२१ सकाळी. ४:४७ वा.