नवनिर्मिती घडवायची असेल तर थोडी तरी कळ सोसायला हवी. वेदना नेहमीच क्लेशकारक असत नाहीत. बऱ्याचदा त्यातून काहीतरी छानच घडत असतं. ते जोखण्याची दृष्टी मात्र हवी!
आयुष्यात स्थैर्य हा केवळ भ्रम आहे. स्थिर राहण्याने फारशी प्रगती होत नाही. जेव्हढी मनात आंदोलने जास्त, चंचलता जास्त, तेवढी विचारांची गती वाढते आणि वेगवेगळ्या घटना घडतात. तुम्ही स्वतः हे नाही केलेत तरी नियती मानवाला कायमच अस्थिरतेच्या अंधकारात गटांगळ्या खायला लावते.