जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे अन्ना सोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे,संपत्ती सोबत धर्म आहे, आणि ओंजळीले दुसऱ्याला देण्याची ताकत आहे! तोच खरा माणूस आहे.....
साधेपणा हे सगळयापेक्षा चांगले सौंदर्य आहे. क्षमा ही चांगली शक्ती आहे,विनमृता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे, आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे.....
हसता हसता सामोरे जावे आयुष्याला, खरच घडवू शकाल भविष्याला, कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही.....,आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही.....
वेळ सोडून या जगात कोणीच न्यायाधीश नाही. कारण वेळ चांगली असेल तर , सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळ ही आपले आणि परक्यांची ओळख करून देते......
नातं बळ देणारे असावं, मागे खेळणारा नसावं, नातं प्रेरणा देणारे असावं,वेदना देणारं नसावं, नातं साथ देणारं असावं,घाव घालणारे नाही.नातं सन्मानित करणारं असावं, अपमान करणारं नसावं.....
जीवनात खरं बोलून मन दुखावले तरी चालेल पण खोटे बोलून आनंद देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करु नका.कारण त्याचे आयुष्य असते तुमच्या विश्वासावर..........