1) नको करू भांडणतंटा विश्वास ठेव माझ्यावर मी तुझ्याचसाठी जगतो आहे आपले मानशील या भरवशावर ।। 2)ज्याच्यावर ठेवला विश्वास त्यानेच घात केला या मतलबी दुनियेत विश्वासच नाही उरला ।। 3)पावसाचा काय भरवसा कधी कुठे पडून जाईल शेतकरी राजा मात्र आशेने त्याच्याकडे पाहत राहील।। 4)विश्वास या शब्दावर सारेच जग चालते म्हणूनच इतिहासात त्याचे नाव गाजते ।।