SATISH KAMBLE
Literary Brigadier
AUTHOR OF THE YEAR 2019 - NOMINEE

171
Posts
160
Followers
1
Following

छोटीशीच परंतु बलवान असते लेखणी, शब्दांची गुंफण कागदावर उतरवण्याचे साधन असते लेखणी...!!! ✒✒✒✒✒✒✒ मी सतीश शिवा कांबळे पुण्यामध्ये स्थायिक असून टाटा मोटर्स कंपनीमध्ये कार्यरत आहे. मी कवितांबरोबरच कित्येक गाणीसुद्धा लिहीली आहेत. त्यातील चार गाणी मी स्वतः लिहून, स्वतःच गाऊन, स्वतःच संगीतबद्ध केलेली... Read more

Share with friends
Earned badges
See all

घटना घडती चांगल्या तेव्हा वेळेला सन्मान मिळे, घटना घडती वाईट तेव्हा दोष तिला देती सगळे वेळ ही असते वेळच आणिक प्रत्येक क्षण असे मोलाचा, महत्त्व कळले जर या क्षणांचे समजेल अर्थ खरा जीवनाचा ✒ सतीश शिवा कांबळे

सर्व दीनदुबळ्यांच्या आयुष्याची पाने सुवर्णाक्षरांनी लिहिणारे महान लेखक कोण ? अर्थातच विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ✒ सतीश शिवा कांबळे

स्वतःचे सुख त्यागूनी करतो परोपकार या जगात जो, आत्मकेंद्री या जगातं ठरतो सर्वांसाठी आदर्श तो ✒ सतीश शिवा कांबळे

पती पत्नीचा संसार असतो राजा आणिक राणीचा, भांडण तंटे, रूसवे फुगवे असूनही असतो प्रेमाचा ✒ सतीश शिवा कांबळे

पृथ्वीवरती अनेक देश त्यामध्ये सुंदर भारत देश, सर याची ना येई कुणाला फिरूनी पहा तुम्ही देश विदेश ✒ सतीश शिवा कांबळे

पूर्वी माणसांची मनेही मोठी होती आणि तशीच मोठी प्रेक्षागृहेही होती. हळूहळू संकुचित झालेल्या मनांप्रमाणेच प्रेक्षागृहेदेखील छोटी होत गेली. ✒ सतीश शिवा कांबळे

गुढीपाडवा आला आता गुढी उभारू एकजुटीची, एकजुटीने लढूनी आपण संपवू दहशत कोरोनाची ✒ सतीश शिवा कांबळे

पाचपेक्षा अधिक माणसे होऊ नका गोळा, शासनाचे नियम पाळा कोरोनाचा संसर्ग टाळा ✒ सतीश शिवा कांबळे

भोवतालच्या परिस्थितीवर नजर फिरवूनी आलो मी, त्यावर गुंफूणी शब्द मी माझे कविता बनवत गेलो मी ✒ सतीश शिवा कांबळे


Feed

Library

Write

Notification
Profile