जीवन जीवन आहे एक रम्य पहाट संकटांनी गजबजलेली एक वादळवाट सोनेरी क्षणाची एक आठवण सुख दुःखाचं ते एक गोड कालवण प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता नात्यांच्या अतुट शब्दांनी गुंफलेली एक कविता जाणिवेच्या पलीकडच एक जगावेगळ गाव यालाच आहे जीवन हे एक नाव..
प्रेम प्रेम म्हणजे समजल तर मनातील भावना केली तर मस्करी, मांडला तर खेळ ठेवला तर विश्वास घेतला तर श्वास रचला तर संसार आणि निभवल तर जीवन...❤💖
सर्जनशीलता कला व्यक्तिमत्त्वाचा वसा आहे सर्जनशीलता सृजनाचे आधारस्तंभ संगीत मनाचा आरसा तर भावना संगीताचे प्रतिबिंब..
शांतता शांततेच्या शस्त्राने जगात शांती स्थापूया नकोत कसल्याही युद्ध, लढाया प्रेम भावना सर्वत्र जागवूया..
शांतता शांतता एक अवस्था मनाची एकांता मधली गर्दीतली कधी हवीहवीशी वाटते कित्येकदा शोधण्यासाठी स्वतःला आधी..
निरोगीपणा विनाकारण चिंता म्हणजे रोगाला आमंत्रण धावपळीत ही शोधावे विसाव्याचे क्षण निरोगी आरोग्य म्हणजेच खरे धन