ओघळतात अश्रू पापणी आडून
आठवण दाटता तुझी मनी
सांग तयांना विसरलो नाही
आस लागते सारखी उरी
#मंथन
तू तुझा डाव खेळून
कधीच मोकळा झालास
आमच्या सोंगट्या अजूनही
रेंगाळत पटलावरी
#मंथन
भिन्न भिन्न रात्र सारी
भिन्न झाली वाट ही
चालतो तरीही गड्या मी
भिन्न तुझी साथ ही
#मंथन
एक नवीन सुरवात
रोज मनातून होते
सूर्य उगल्यावर ती
नवी भरारी घेते
#मंथन
आज तुझ्या समोर...
मी माझं मन मांडले...
तु रोज सारखेच त्याला..
खोटं खोटं मानलेस..
#मंथन
मन वेडं असतं
त्याला कुठं काय कळते
एक गार हवेची झुळूक येता
ते वार्याच्याही मागे पळते
#मंथन
सार काही तू
वेळेवर सोपवून दिले
वेळ मात्र वैरी
तिच्या मनासारखे झाले
#मंथन
प्रेमात म्हणे वयाला
बंधन नसते काही
तरी समाजाला त्याची
द्यावी लागते ग्वाही
#मंथन
तू विसरलीस..
पण मी कसा विसरू.
खांद्यावर डोक ठेवून.
तुझे ओघळणारे अश्रु..
#मंथन