तारे नभात होते अन चांदणे उशाशी
माझे मला न कळले नाते कधी कुणाशी
होतो कुठे निघालो आहे कुठे उभा मी
केला कधीच नाही संवाद पावलांशी
सोडून गाव जेव्हा शहराकडे निघालो
गेला तुटून मागे संपर्क जीवनाशी
बदलून पाहिले मी चष्मे तरी दिसेना
घ्यावी करून म्हणतो तडजोड
जीवन निघुन गेले
सगळ्यांना खुश ठेवण्यामधे
जे आपले होते ते कधी खुश झालेच नही
जे खुश झाले ते कधी आपले झालेच नही