कित्येक दिवाने झाले घायाळ
तु मारताच नजरेचा तीर,
म्हणे मी तुझा गं रांझा
तु बन ना गं माझी हीर!
स्वप्नभऱ्या नयनांतुनी
अश्रृ घेती रोज दिक्षा,
तुटलेल्या हृदयास माझ्या
फक्त तुझीच प्रतिक्षा!
मी ही शिकले आता
खोटं खोटं हसायला,
मनातलं मनात साठवायला,
अश्रृ डोळ्यातच आटवायला!
परिस्थिती बदलेल असं वाटनं जेव्हा बंद होते ना!
तेव्हा मनस्थिती बदलून घ्यावी
जा तू खुशहाल दूर
पण जातांना मला तू
माझ्या विश्वासाला तोडण्याचे,
माझ्या भावनांशी खेळण्याचे,
कारण देऊन जा....
प्रतिक्षा (रूही) सदानंद कापगते