None
आषाढ आता बेधुंद बरसावा, ग्रीष्माचे चटके सोसलेत खूप, कोरड्या मातीस आस आता, थेंबांच्या ओलाव्याची ऊब...
तुझे मला शब्दांनी बांधणे, अन् शब्दांनीच होते सोडवणे, असे कसे हे प्रेम सख्या, होई तुझ्यात माझे गुंतणे... - Yogini " कृष्णाई "
पाहुनी स्वतःचे प्रतिबिंब, राधा लाजुनी जाई, कृष्ण सख्याच्या येण्याने, ती कावरीबावरी होई...