प्रेमाचा अर्थ खरा प्रेम
करणा-यालाच कळतो.
चंदनाचा सहवास लाभला तरी,
देह मात्र चिते प्रमाणेच जळतो.
{ एस के.जी }.
सांगायला सर्वच आपले असतात,
अपले मात्र सागायालाच असतात.
उगवत्या सूर्याला सर्व सलाम करतात,
अंधारात सावल्याही येथे पळ काढतात
{ एस के.जी }.
लपवण्यात जी मजा आहे,
ति सांगण्यात नाही.
रहस्य दडवण्यातच आहे
मजा औरच काही.
{ एस के.जी }.
या दुनियेची काय अजबच
त-हा आहे.
लोक, लोकांना,डोळ्यात वसवतात
येथे,नजरेतुन पाडण्यासाठी.
{ एस के.जी }.
माणसा माणसातच,
असतो जातीचा भेदभाव.
निसर्ग कधीच करत नाही,
कोणालाच मज्जाव.
{ एस के.जी }.
अलीकडे लक्ष नाही,
विचार पलीकडे.
बसलेत मंदिरात जरी,
लक्ष चप्पली कडे.
{ एस के.जी }.
घाई असते बाहेर जाण्याची,
लोकांना मंदिरात शिरल्यावर.
जागते भक्ती येथे,
पापाचा घडा भरल्यावर.
{ एस के.जी }.
स्वभावात शोधा माणसाला,
चेहरा तर फसवुण जातो.
जे बघायचे असते आपल्याला,
तेच तो नेमक दाखवुन जातो.
{ एस के.जी }.
तो हिन्दुंची पोळी हि खातो,
तो मुसलीमांची रोटी हि खातो.
तो एक भुकेलेला जीव,
कोठे कोणाची जात पाहातो.
{ एस के.जी }.