🌹 प्रेमऋतू 🌹 आला आला प्रेमऋतु द्यावा एक गुलाब आई वडिलांना। दाखविले जग सुंदर आपल्याला ऋण त्यांचे कसे फेडू सांगा। सौ.समिक्षा बाळासाहेब जामखेडकर औरंगाबाद🙏
वाचकांनी वाचून प्रतिक्रिया कळवावी, म्हणून मी लिहिते छान छान ओळीं। माझ्याकडून सर्वांना आनंदात भरभराटीची सुखसमृद्धीची जावो दिवाळी🙏
बायकांच्या पोटात काही राहत नाही त्या आपापसात कुजबुजतात। तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको म्हणून एखादी बातमी सगळीकडे पसरवतात.😃
स्वागताला हजर असतात माझ्या कवितेचे शब्द नेहमी। मी चुकले कधी काही तर करतात माझी कान उघडणी मी ही शब्दांना जपूनच वापरते शस्त्र आहे ते मी जाणते।🙏
वहीवर लिहिताना भावना कधी दाटून येतात। लेखणी थांबते लिहायची थोडावेळ। अश्रू पापण्यांच्या काठावरून अलगद ओघळून जातात।