तू माझी कुणी नाहिस तसा मीही तुझा कुणी नाही तसे आपण दोघेही एकमेकांचे कुणी कुणीच नाही पण आयुष्याचा ग्रंथ वाचताना आपण दोघेही एकमेकांचे डोळे झालो होतो का? @जयेश शत्रुघ्न मेस्त्री
ये निद्रे मज बिलगून घे. तिच्या-माझ्या मिलनाची एकची जागा. स्वप्न-नगरीच्या त्या सुंदर फ़ुलबागा. मज प्रिये मिलन होऊ दे. ये निद्रे मज बिलगून घे. @जयेश शत्रुघ्न मेस्त्री
तुझ्याशी संवाद म्हणजे एकप्रकारे शाब्दिक प्रणयच. आणि या प्रणयमालेतुन जन्माला आलेलं अपत्य, म्हणजेच माझी कविता......... @जयेश शत्रुघ्न मेस्त्री
तू आणि मी मी आणि तू तुझ्यातला मी आणि माझ्यातला तू जर काढून टाकला, तर काय उरेल? @जयेश शत्रुघ्न मेस्त्री
चुंबिलेस ओठ माझे अन चुंबिल्यास माझ्या वेदना क्षणभर मीही विसरलो या चुंबनाच्या वेदना @जयेश शत्रुघ्न मेस्त्री
सोनेरी वस्त्र धारुनी, नवी पहाट उगवली. झोपडीला छीद्रे फुटली, अंधारावर खुदूखुदू हसली. @जयेश शत्रुघ्न मेस्त्री
एकदा एक ओळखिचा माणूस म्हणाला मला..... "कधीतरी माणसात वावरत जा?" मी त्याच्याकडे स्मीत हसत म्हणालो, "आता कुठे माणसात आलोय". @जयेश शत्रुघ्न मेस्त्री
हम चैन की नींद सोना तो चाहते है, लेकिन क्या पता किस बहन की चीख से नींद खुल जाए @जयेश शत्रुघ्न मेस्त्री