आई
आई असते दिव्याचा प्रकाश
बाळाला तेजस्वी जीवन देते।।
दळण असते दळत घराचे
देवकी यशोदेच प्रेमही देते।।
तुझ्याविना चन्द्र पोरका
जणू सागर वात्सल्याचा।।
उडान घेण्यास पंख देते
नसतो क्षण विसाव्याचा।।
कवी:-स्वप्नील सरडे
7030756148
कविता
जीवनाच्या माझ्या वाटेवर
तुझी सावलीच मी चढतो।।
अग सखे कविते माझी
तुझं लिहूनच मी घडतो।।
कवी
अंधश्रद्धेचा करतो त्याग
लढतो, झगडतो दैवशी।।
माणुसकी शिकवतो वागण्याची
माणूस बनून माणसाशी।।