जिच्यामुळे जीवन मिळते ती म्हणजे ए 'आई'...... आणि जिच्या मुळे जीवनसाथी मिळतो ती अहो 'आई'... एक आहे म्हणून माहेर आहे आणि दुसरीमुळे सासर.... या दोघींमुळे आपल्या आयुष्याला अर्थ आहे... अन्यथा जीवन व्यर्थ आहे...
लागता डोहाळे होतो खूप त्रास,पार करावा लागतो ९ महिन्याचा प्रयास.... रूप पाहता तुझे लोभस,पडे साऱ्याचा विसर.... भरून येती लोचने,आनंदाला नाही पारावार..... असा असतो थोडा खडतर 'आई' होण्याचा प्रवास....
मुलांना घडवताना साम,दाम,दंड यांचा करते ती वापर, तेव्हा ती ठरते आई हिटलर.. तेवढेच करते लाड अन् पुरवते हट्ट.. मोठे झाल्यावर समजतात तिने केलेले कष्ट... प्रेम,संस्कार,शिस्त यांची घालून सांगड बनवून देते आयुष्य सुखकर.. तेव्हा मिळते तिला एक नाम ते म्हणजेच 'सुपरमॉम'...