मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा ,
मैर्ती एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा ,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची
कोण काय करतो ?
तर कोण काय म्हणतो?
कोण कसा वागतो ?
हे त्याचे त्याचे कर्म
पण त्याच्या वागणूकीने
का सोडावा
आपण आपला धर्म ?
स्वप्ने माझी मी तुझ्यात पाहिली,
दु:खे सगळी तुझ्यामुळे विरली,
आनंदी हिंदोळ्यावर मने झुलली,
प्रफुल्लित पहाट तु अमच्या जीवनी.
त्याच पडणार प्रत्येक पाऊल
आनंद होइ मनाला
आजचा ठाम विश्वास मला
तो उद्या जिंकेल जगाला
सावरण्या मनाला घेतला तिचा सहारा
सोडले असे अधांतरी तिने
ना दुर दुर किनारा
हृदयाची भळभळणारी जखम दाखवू कुणा
का वेड्या गुंतवुनी
केला मोठा गुन्हा.
मिठीत माझ्या
तु सदैव कैद राहशील सखे
तु फक्त इशारा
एक प्रेमबंधाचा दे
मंद मंद प्रकाशात पाहिला तिचा चेहरा हसरा
बेभान झालो असा कि
नाही उरला काही आसरा
आठवांचा पाऊस नभी दाटला
झाले आकाश मोकळे तुझ्या फक्त स्पर्शाने