कोण काय म्हणेल याचा
करू नये विचार
वाट तुझी तुचं चाल
स्वप्न करण्या साकार...
भरत कांबळे
थंडीचा कडाका वाढलाय
अंगात हुडहुडी भरतेय
काळजी घ्यावी आपली
सर्दी,खोकला होतोय
भरत कांबळे, लातूर.
कुणाचा गरीब,तर कुणाचा
श्रीमंत घरी जन्म होतो
मात्र सर्वांनाच सुख दुःखाचा
प्रवास करावा लागतो ...
भरत कांबळे
क्रांतीसूर्य समाज सुधारक
महात्मा जोतिबा फुले
थोर तुमच्या उपकारामुळे
शिकू लागली बहुजनाची मुले
भरवसा नाही आयुष्याचा
आयुष्य खूप लहान आहे
आनंदाने जगून घे ...
महामारी पसरली आहे
आईचं प्रेम हे
खरंच निराळे असते
तिचे सगळे ध्यान
चिल्यापिल्यावर असते
तुझे माझ्या जीवनात
येणे कारण ठरले
तुझ्या येण्याने माझे
जीवन बदलून गेले
काय सांगावे कसे सांगावे
आजघडीचे जीवनगाणे
जगणे झाले केविलवाणे
कुणा सांगावे रडगाणे
मनातील गुपीत कुणाच्या
कळणार कसे कुणाला
मनातील घालमेल कुणाच्या
नाही कळणार कुणाला ...