हे जग स्वप्नांचा मायाबाजार पाण्यांवर चंद्रकिरणे तरंगे आकाशी ईच्छांचे आकाशदिवे अंधारी रमले काजव्यांसंगे ।। कवी विवेक जोशी
" शोध " आणि "बोध" या दोन रुळांवरूनचं प्रवासणारी, आयुष्याची आगगाडी ध्येयाच्या "मुक्कामाला" पोहचते...! कवी विवेक जोशी
माणसांंचं माणूसपण सांगते काचेचा धर्म त्यात प्रतिबिंब दिसलं तरी तडकण्यात असते अनास्थेचे मर्म कवी विवेक जोशी
दे सूर्य चंद्र तारे अवखळ वारे अथांग सागर पृथ्वी असीम आकाश दे उन्नत माथा अमर हिमालयाचा पाऊस वारा प्रसन्न प्रच्छन्न प्रकाश - विवेक द .जोशी