आयुष्यात प्रत्येक गोष्टीवर हक्क दाखवायचा नसतो, फक्त कर्तव्य करत रहायचं, जसं तु आणि मी आपल्या प्रेमाच करतोय तसं.. - विशाल सावंत.
जिद्द बाळगायला जिद्दी मन लागत, पण ते तोच करू शकतो जो विधीच्या समोर ताठ मानेन उभं राहु शकतो.... ऐऱ्यागैर्याच काम नाही स्वतः ला सिद्ध करणं, त्यासाठी झिजाव लागत चंदनापरी, आणि त्याचा सुगंध म्हणजे तु.. त्या सुगंधाचा सुवास यायला मनही तसंच लागत, जसं नामस्मरणात रमाव लागतं त्या मलमली सुगंधासाठी.. इतकं सोपं आहे का ते... -विशाल सावंत
सुगंध सुगंध तो दरवळला कसा, सात समुद्रापार पोहोचला असा, संस्कार संस्कृती सोबत घेऊन, रोवला झेंडा परिश्रम दाखवूनी.. करूदेत दुर्लक्ष दुर्दैवी प्रवृत्ती, त्या ना अडवू शकती ना घडवू शकती, घेतली भरारी उत्तुंग त्या पिल्लाने, हे दुर्दैवी त्यास ना कधी दडवु शकती... एका माऊलीच्या मनाचा तुरा.. -विशाल स्वाती दिलीप सावंत.