बदनामीचा कलंक लावण्या मात्र चुकीचा रस्ता नसतो पाठीमध्ये घाव घालण्या फक्त जवळचा खरा लागतो.. कोणी चालतो,कोणी घसरतो प्रत्येक रस्ता खडतर नसतो वळणावरती प्रत्येकाच्या एक विसावा हवा वाटतो...
नात्यांना उलगडून अपेक्षा,उपेक्षा झुगारून खऱ्या दृष्टी कक्षेत समावणाऱ्या सूर्य तेजाने वलयांकित होणाऱ्या अनमोल बंधाला मैत्री म्हणावं का..?
माझ्या हृदयाचा कत्ल-ए-आम होताना तुझेही हृदय पिळवटेल... तुझ्या जुलमी नजरेची धार तू म्यान कर! © गोविंद ठोंबरे
विचारायला तुही हवं आहेस,तुझ्याच स्पंदन गजराला... तो चुकलेला हृदयाचा ठोका नेमका कोणासाठी आहे? - गोविंद ठोंबरे