प्रेरणादायी गोष्टींची आठवण करावी रोज
दुःख, वाईट,अपमान, अपयश यांना द्यावा निरोप
प्रा. शालिनी सहारे
आयुष्यातला महत्त्वाचा क्षण , संस्कारांचे घर , अनुभवाची शिदोरी, मायेची सावली म्हणजे शाळा
प्रा. शालिनी सहारे
योग्य वयात शहाणपण, आणि समजूतदारपणा आला की आयुष्याचा उत्सव होतो.
प्रा. शालिनी सहारे
वयाने येणाऱ्या शहाणपणापेक्षा अनुभवाने येणारे शहाणपण केव्हाही चांगले
प्रा. शालिनी सहारे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी संधीची वाट पाहत बसण्यापेक्षा ती खेचून आणली तरच यशाचे शिलेदार होता येईल.
प्रा. शालिनी सहारे.
दोस्ती यारी हवीच भारी
तरच दुनियादारीला लज्जत न्यारी
प्रा. शालिनी सहारे
घात तिथेच होतो, जिथे आपण एखाद्या व्यक्तीला आपले मानून त्यावर विश्वास ठेवतो.
प्रा. शालिनी सहारे
आपल्या भाग्यात माणसं असणं हे भाग्य, पण आपल्या भाग्यात आपली प्रेमळ, विश्वासू माणसं असणे हे महाभाग्य
प्रा. शालिनी सहारे.
आज केलेले कष्ट, प्रयत्न हे तुमच्या भावी आयुष्यात आनंद नक्कीच रंग भरतात.
प्रा. शालिनी सहारे.