*साक्षर* सावित्रीने दाखवली वाट शिक्षणाची महिलांना साक्षर करण्यासाठी अक्षरे गिरवली तरच होईल उध्दार जीवनात यशस्वी होण्यासाठी सौ.आश्विनी सुहास मिश्रीकोटकर
जीवन जीवनात ध्येय गाठण्यासाठी मनुष्याने सतत आणि चांगले सत्कर्म केले पाहिजे. सौ.आश्विनी सुहास मिश्रीकोटकर
सामाजिक समाजात मान मिळवायचा असेल तर मनुष्याने सामाजिकतेचे भान ठेवून वागले पाहिजे. सौ.आश्विनी मिश्रीकोटकर
माता मायेचा ओलावा जिथे पाझरतो हृदयाचे स्पंदन जेव्हा वाढते मातेचा स्पर्श मधुर वाटतो त्या प्रेमाचे नाव म्हणजे आई असते. सौ.आश्विनी सुहास मिश्रीकोटकर
तीव्र आपल्या लोकांनी दिलेल्या वेदना एवढ्या तीव्र असतात. कि आयुष्य भर त्या गोष्टीचा त्रास होत असतो. सौ. आश्विनी मिश्रीकोटकर
चाक चाक हे प्रगतीचे लक्षण आहे. चाक फिरले तरच ते पुढे जाणार.तसेच मनुष्याने सतत कार्यरत राहिले पाहिजे.तरच त्याच्या यशाचे चाक फिरत राहिल. सौ.आश्विनी सुहास मिश्रीकोटकर
माती जीवन हे क्षणभंगुर आहे. वाईट गोष्टींना पाठीशी घालून आपल्या आयुष्याची माती करून घेऊ नये. सौ.आश्विनी सुहास मिश्रीकोटकर
संपत्ती आयुष्य भर कितीही संपत्ती जमवली.तरीही प्रत्येकाला आयुष्याच्या शेवटी मात्र रिकाम्या हातानेच या जगाचा निरोप घ्यावा लागतो. सौ.आश्विनी मिश्रीकोटकर