हरवलेली मैत्रीण जसी ऊन्हात हरवलेली माझी सावली, तिच्याविना ना रंगला तो भातुकलीचा खेळ होती ती खेळात गोड हसरी बाहुली.
तुझ्यापासून खूप दूर दूर अशी अवकाश झेप घेतलेय मी, आणि पुन्ह: तुला भेटण्यास सागरात प्रतीबिंब पाडलंय मी.
निशब्द.... काही वेळेला भावना व्यक्त करण्यास शब्दांची गरज नसते,पण निशब्द तिथेच रहा जिथे समोरच्या व्यक्तीची निशब्द भाव ओळखण्यची कुवत असते.
जूने ते सोने ...... "ज्ञान लाभले पुर्वजनांचे जपुया ठेवा तो संस्कारी, अज्ञात पिढी पण विचारवाणी तयांचि भारी."