#अलक दवाखान्यात भरती,मरणाच्या दारात असलेल्या आपल्या लहान मुलासाठी औषध घ्यायला गेलेला तो, पैसे कमी पडले म्हणून दुःखी मनाने परत येत असताना एक दुचाकीचा अपघात दिसला. त्याच्याच वयाचा व्यक्ती जिवाच्या आकांताने आपल्या जखमी मुलाला वाचविण्यासाठी मदत मागीत होता.. हा मदतीसाठी धावला,तेवढ्यात त्याचं लक्ष पडलेल्या पैशाच्या बटव्यावर गेलं.. बटवा उचलला आणि पसार झाला. @अर्चना अनंत.