लपून तुला पाहता
मनी उठती तरंग
रंगे भावनांचा खेळ
जागती नवे उमंग
✍🏻 *सुनिता येवले*✍🏻
"पाऊस"
धरेच्या उदरात बी
रुजे पाऊस स्पर्शाने
हरित हास्याने तिच्या
तृणही डोले हर्षाने
✍🏻सुनिता येवले
कमरेला शेला
हातामध्ये बासरी
मस्तकी मोरपीस
धारण करे कंसारी
~ सुनिता येवले.
निळासावळा कृष्ण दुलारा
भाळी मोरपिस हाती पावा
यशोदेचा कान्हा लाडला
वेड लावी गोपिकांच्या जीवा
सुनिता
नकोच नुसता रुक्षपणा
नात्यांत हवा स्नेहभाव
सारून दयावे हेवेदावे
मनांत वाढावा प्रेमभाव
~ सुनिता येवले.
उंबरा ओलांडून आले
सख्या सासरी नांदण्यासाठी
पाश माहेराचे तोडले
आता जीवन तुझ्याचसाठी
~ सुनिता येवले.
रम्य पाऊस धारांनी
सृष्टी न्हाती धूती होते
लेवून हिरवाईचा साज
जणु नवती सजते ||
~ सुनिता येवले.
धून मंजुळ पैंजणांची
चाहूल लावती लेकीची
कन्यारत्न आलेया पोटी
शोभा वाढली अंगणाची ||
सुनिता येवले.
येरे येरे पावसा
नको मारुस दडी
आसावला बळीराजा
लागू दे रे झडी..
~~ सौ. सुनिता येवले.
जळगाव