कसं जगायचं माहित नसते
आणि आपण म्हणतो
जीवन खूप अवघड आहे.
जगायला तर घे
उद्या तूच म्हणशील...
हे तर किती
साधं,सरळ, सोपं आहे.
आपण रोजच जगतो
पण आठवणीत तोच दिवस
परत परत जगतो
जो आनंदात जगतो.
घरात एक वादळ घुसले,
अन् त्याला बाहेर काढण्याच्या नादात...
मीच घराबाहेर पडले,
अन् रस्ता दिसला.
आयुष्य हे खूप सुंदर आहे
अगदी आपण घालतो,
त्या कापड्यासारखं.
जेवढं साधं तेवढंच सुंदर
फक्त आपण स्वतः किती
सफाईने आणि कौशल्याने
हाताळतो त्यावर ते ठरते.