अंतर्मनात डोकावल्यावरच
मनातील गढूळता आणि स्वच्छता
याची जाणीव होते.
गाडी चालवताना
सदा असावे दक्ष
आपल्या मार्गावर
असावे सदैव लक्ष
सौ. सविता काळे
विठू नामाच्या गजरात
आत्मा झाला लीन
हरीच्या भेटीपुढे
सर्व सुखे वाटती हीन
सौ. सविता काळे
विज्ञानाच्या साथीने
करू प्रगतीची सुरूवात
तंत्र नवे आजमावुनी
समस्येवर करू मात
सौ. सविता काळे
आयुष्य जगावे मजेशीर
विसरून सारे ताण
बहरेल सूख जीवनी
येईल आनंदाला उधाण
सौ. सविता काळे
समजावू मनाला
माहीत आहे, थोडं आहे हट्टी
कधीतरी घेऊया
विचारांपासून सुट्टी
सौ. सविता काळे
भूत, भविष्य, वर्तमानाचा निर्माता
ईश्वरच आहे कर्ता करविता
सौ. सविता काळे
लेखक
विचारांची उंची गाठून
मनातील भावनांना वाट मिळते
विविध साहित्य, वाङमय
लेखकाच्या लेखणीतून सजते
सौ. सविता काळे
हुशारी ही सांगण्यात नसते
तर ती कतृत्वातून दिसते
सौ. सविता काळे