चंद्र रात्र निभावून नेतो म्हणून सूर्याचं उगवणं थांबत नाही. कुणी दुसऱ्याने जबाबदारी घेतली म्हणून आपण आपल्या कर्तव्यांपासून आणि जबाबदारीपासून मुक्त होऊ शकत नाही. - सानिका संजय येवले
सातत्याने वर्षभर एखादी कार्य करत राहीलं की सफळतापूर्ण दिन बघायला मिळतो..तो वर्धापनदिन...! - सानिका संजय येवले
एखाद्याशी मैत्री करू शकला नाहीत तरी चालेल पण कुणाचा द्वेष करून स्वतःच्या नुकसानाला आमंत्रण देऊ नये. - सानिका संजय येवले
वाट नागमोडी, उथळ, दगडधोंड्यांची असली ना की प्रवास जास्त सुंदर होतो. एक सरळ, शांत असणाऱ्या वाटेत ती मजा नाही. - सानिका संजय येवले