मुखाने घेता रामनाम, मुख होते पवित्र ब्रह्मज्ञानाने होई हृदय पवित्र, तीर्थाटन करी पायाना पवित्र, दानाने होतात हात पवित्र.
प्रगतीसाठी सहाय्यक असे मन, प्रगतीतील अडथळाही असे मन, जिंकीले मन ज्याने, मन मित्र तयाचे नसे नियंत्रण मनावर ज्याचे, मन शत्रू तयाचे.
कांद्यावर जसे सालांचे आवरण असते त्याप्रमाणे आपल्या मनावर (दोष, अवगुण अनेक आवरणे असतात. त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न तोपर्यंत केला पाहिजे जोपर्यंत ते चांगले विचार, चांगले शब्द, योग्य वृत्तीमधे बदलत नाहीत.
हे देवा माझे कान चांगले ते ऐकू देत, डोळे माझे चांगले ते पाहू देत, हात माझे कार्यरत राहू देत, पाठ माझी भार वाहण्यास समर्थ असू देत, पाय माझे सन्मार्गावर चालू देत, शरीर सुदृढ, निरोगी राहू देत,. असे हे जीवन तुझ्या भक्तित राहू देत. g