Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your E-book published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your E-book published

#शब्दांची नगरी

PARTICIPATE

Share with friends

स्टोरीमिरर व काव्य निनाद साहित्य मंच पुणेआयोजित विशेष मासिक साहित्य लेखन उपक्रम

                    "शब्दांची नगरी"  

          कथा/कविता /चारोळी साहित्य लेखन उपक्रम.

10 एप्रिल 2021 ते 10 मे 2021 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.  

मनातले शब्द ओठावर येतात ओठांवरील शब्द मंग वहीत अथवा कागदावर खरं तर हा सर्व खेळ शब्दामुळे होतो. जिथे असतात अनेक भावना,अनेक यातना, सुखं फुललेलं, तर दुःख दडलेलं, वेदनाच्या घावाने अगदी काळीज कुरतडून गेलेलं तर, कुठे आनंदाच्या ओघात मन बहरलेलं, तर काही शब्द असतात धारदार जे शस्त्र करू शकत नाही ते लेखणी करते, याच शब्द नगरीत असते कुठं बालपण,ते रम्य दिवस जे प्रत्येकालाआठवणीच्या पुरात वाहून नेतात.

तर याच शब्दांच्या नगरीत असेही काही घरे आढळतात जिथं की आयुष्याचा प्रवासा करतांना त्यापासून खुप काही शिकण्या जोगे असतं ते म्हणजेच अनुभवाचे बोल, काही घर असतात ओसाड पडलेले ज्याच दुःख एकूण उरात भावांना दाटून येऊन लोचनातूनी अश्रू वाहू लागतात,गरिबी अन दुःख दारिद्र्य परिस्थिती अभावी उदासलेलं जीवन, तर कुठे असतात सुखाचे क्षण शब्द नगरीत असतं खूप काही जिथं मन रमून जातं, तिथं असतात एकांत वेळी आठवलेल्या ओळी तर कुठे चारोळी, काळजाला भिडणाऱ्या कथा, त्यात शेतकऱ्यांच्या व्यथा, शब्दासी शब्द अर्थ बोध पूर्ण असणाऱ्या कविता आढळतात याच नगरीत.

अश्या या साहित्य क्षेत्रातील शब्द नगरीत जायला मन फार धाव घेते याच शब्द नगरीत घर बांधून राहायला ही हवंहवं से वाटते,तिथं मन रमून जातं मन अगदी प्रसन्न होतं.

चला तर मग अशा शब्द नगरीत नक्कीच प्रवेश करूयात ते ही आपल्या लेखणीच्या साह्याने .                      

नियम व अटी :

1.कथा,कविता,चारोळी मराठीत स्वीकारल्या जातील.

2.स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करणे अावश्यक आहे. स्पर्धक अनेक साहित्य रचना सादर करु शकतात, त्यासाठी संख्येची मर्यादा नाही. 

3.उपक्रमात सहभाग घेताना विषयाचे कोणतेही बंधन नाही. आपण आपल्या आवडत्या विषयावर साहित्य लिहू शकतात.

4.उपक्रमात एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.

 5.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.  

 पुरस्कार :

* सर्वोत्कृष्ट 50 कविता,चारोळी एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.

* सर्वोत्कृष्ट 50 कथा एका ई बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.

* सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील. 

टिप : ई- पुस्तक संग्रह स्टोरीमिररच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येईल.

निकाल : 15 जून 2021

संपर्क :   रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी विभाग प्रमुख ) मो: 9768065763.