ऋतूंचा राजा वसंत हाच तो मनमोहक तो कालावधी फाल्गुन व चैत्राचा थंडीही समान व उष्णताही समान असा चैत्र अगदी आल्हाददायक निसर्गाने एखाद्या नववधूप्रमाणे जसे साजशृंगार केली की काय,वृक्षांना नवी पालवी फुटणारी चैत्र पालवी ,कोकिळाचे मधुर स्वरात गीत आम्रवृक्षाला येणारा मोहोर अनेक प्रकारची रंगी बेरंगी फुले फुलू लागतात.
त्यांच्या वातावरणात मंद असा सुगंध येऊ लागतो फुलपाखरे या फुलांवरून त्या फुलावर भिरभिरतात.शेतात डोलणारे गहू व ज्वारी चा पाचुन्दा हरभरे व करडीचे खळे मंद धुंद वारा चंद्राचे शीतल चांदणे या वसंतात फुलून येऊ लागतात
वसंतपंचमीच्या दिवसाने वसंत ऋतूचे स्वागत होते.
चला तर मग अशा विविध मनमोहक वसंताचे रमनीय क्षण आपल्या लेखणीतून साजरा करूया
साहित्य प्रकार : कथा कविता
साहित्य सादर करण्याचा कालावधी: दि. 6 एप्रिल 2022.ते 4 मे 2022.
स्पर्धेचे नियम -
1.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
2.सहभागींनी त्यांच्या मूळ साहित्य सादर केल्या पाहिजेत. शब्दांचे बंधन नाही.
3.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.
4.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.
5.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.
6.स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.
7.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
8.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.
9.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असल.
बक्षीसे
*सर्वोत्कृष्ट 10 कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)
*सर्वोत्कृष्ट 10 कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)
* सर्वोत्कृष्ट 50 कविता एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.
* सर्वोत्कृष्ट 20 कथा एका ई बुक मध्ये प्रकाशित करण्यात येईल.
सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येतील.
निकाल : 10 जुन 2022.
संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)
मो : 9768065763.