जीवनातील संघर्ष अटळ आहे. जीवनात चढउतार असतातच. संघर्षातूनच आपल्या पंखाना बळ मिळते. संघर्षाने आपण कणखर बनतो.
मनाची प्रगल्भता वाढते. जीवना कडे पाहण्याची दृष्टी व्यापक बनते. आपण अनेक संघर्षावर मात करत पुढे जात आहोत.
आपल्या जीवनातील संघर्ष अनुभव हा इतरांसाठी ‘प्रेरणा’ असू शकते…
स्टोरीमिरर व विश्वभान प्रतिष्ठान प्रस्तुत
storymirror.com या ऑनलाईन व्यासपीठावर
"जीवन एक संघर्ष "
कथा-कविता,चारोळी आणि कोट्स, लेखन स्पर्धा दिनांक, २५ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०२० या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
ही स्पर्धा श्री जगदीश अनंत संसारे सर. यांच्या विश्वभान प्रतिष्ठान अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येत आहे.तरी सर्व लेखक,कवी स्पर्धकांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घ्यावा.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
चला तर मग या स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्यातील लेखकाला सर्वांसमोर आणा.
स्पर्धेचे नियम -*
१.कथा कविता,चारोळी,कोट्स मराठीत सबमिट करता येतील.
२.स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकतो. वयाचे कोणत्याही प्रकारचे बंधन नाही.
३.स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील,
४.संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स कमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.
५.स्टोरी मिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
स्पर्धकांनी त्यांचे मूळ लिखाण सबमिट करावे.
६.सबमिट करण्यासाठी साहित्य संख्येचेही बंधन नाही.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.
७.निबंध/लेख सबमिट करण्यास परवानगी नाही.
८.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.
*बक्षीसे*
*सर्वोत्कृष्ट १० कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)
*सर्वोत्कृष्ट १० कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)
*सर्वोत्कृष्ट १० कोट्स विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
* सर्वोत्कृष्ट ५० कविता,चारोळी एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.
* सर्वोत्कृष्ट २० कथा एका ई बुक मध्ये प्रकाशित करण्यात येईल.
*- सर्व सहभागी स्पर्धकांना रु. १०० मूल्याचे स्टोरी मिरर शॉपिंग व्हाऊचर आणि डिजिटल सहभागीता प्रमाणपत्र ई-मेल द्वारे देण्यात येईल.
*पात्रता* -
स्पर्धेचा कालावधी- २५ ऑक्टोबर ते २०नोव्हेंबर २०२०
निकाल- २५ डिसेंबर २०२०
भाषा- मराठी
संपर्क:
श्री.रोशन मस्के. (स्टोरीमिरर मराठी विभाग प्रमुख)
मो : 9768065763
marathi@storymirror.com