STORYMIRROR

#" मी अनुभवलेला पाऊस "

SEE WINNERS

Share with friends

साद पावसाची आली

शहारली माती

भुई सवे आभाळाची 

जुळे आज प्रीती


शांता शेळके.


सर्वजण पहिल्या पावसाचा आनंद लुटतात पावसात भिजण्याची गंमत वेगळीच असते. ती पावसाची सर जेव्हा पडते तेव्हा जो आनंद होतो तो खूप मनाला वेड लावून जाणारा असतो. . प्रत्येकासाठी पावसाची स्वतः वी अशी खास एक आठवण असते. प्रत्येकजण त्यात स्वतःचे अबोल मन शोधत असतो पाऊस म्हणजे ती तो आणि एकांत, संगीत प्रेमींसाठी पाऊस म्हणजे जणू निसर्गाने गायलेली एक गझल, लहान मुलांसाठी पाऊस म्हणजे पर्वणीच निसर्गाशी इथूनच त्यांची नाळ जोडली जाते... शाळेची सुरुवात रेनकोट छत्री शिवाय अपूर्णच. निसर्गप्रेमींसाठी पाऊस म्हणजे आनंद सोहळा... आणि शेतकऱ्यांसाठी आशा निराशा घेऊन येणारा.

असा हा पाऊस आपल्याला आयुष्यच मर्म ही सांगून जातो..


चला तर आपण अनुभवलेल्या पावसातील आठवणी कथा, कवितेच्या माध्यमातून मांडूया


साहित्य प्रकार: कथा, कविता


साहित्य सादर करण्याचा कालावधी: दि.7 जुलै 2022.ते 6 ऑगस्ट 2022.



स्पर्धेचे नियम -


1.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.


2.सहभागींनी त्यांच्या मूळ साहित्य सादर केल्या पाहिजेत. शब्दांचे बंधन नाही.


3.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक साहित्य देखील सादर करु शकतात.


4. तुमची कथा, कविता, आधीच स्टोरीमिरर वर प्रकाशित असल्यास, तुम्ही ती पुन्हा़ सबमिट करू शकत नाही.


5.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.


6.स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.


7.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.


8.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.


बक्षीस


* सर्वोत्कृष्ट 5 कथा, व 5 कविता, संपादकीय गुणांनुसार विजेत्या म्हणून घोषित केल्या जातील. आणि बक्षीस म्हणून डिजिटल विजेते प्रमाणपत्रासोबत, ₹ 300 चे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर देखील दिले जाईल.


* सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.



निकाल : 15 ऑगस्ट 2022.


संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)


9768065763.