आपले आयुष्य हे विविध रंगांनी नटलेले आहे आयुष्यात सुख-दुःख प्रेम शांती त्याग समर्पण समृद्धी अशा अनेक गोष्टीचा अनुभव आपण घेत असतो व त्याप्रमाणे आपले जीवन जगत असतो जीवनात या सर्व गोष्टीचे अनुभवातून विविध प्रकारच्या आयुष्य रुपी रंगाची उधळण आयुष्यात होते.चला तर मग आपल्या आयुष्यातील अनेक विविध रंग , हे आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडून या.
चला तर मग आपल्या आयुष्यातील घडामोडी म्हणजेच आपल्या आयुष्यातील इंद्रधनुष्य व त्यातील विविध रंग लिहूया या उपक्रमात.
नियम व अटी :
1.कथा,कविता,चारोळी मराठीत स्वीकारल्या जातील.
2.स्पर्धकांनी आपली मूळ साहित्य रचना सादर करणे अावश्यक आहे. स्पर्धक अनेक साहित्य रचना सादर करु शकतात, त्यासाठी संख्येची मर्यादा नाही.
3.उपक्रमात सहभाग घेताना विषयाचे कोणतेही बंधन नाही. आपण आपल्या आवडत्या विषयावर साहित्य लिहू शकतात.
4.उपक्रमात एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.
5.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
साहित्य प्रकार: कथा, कविता, चारोळी.
साहित्य सादर करण्याचा कालावधी: 14 मे 2021 ते 12 जून 2021.
पुरस्कार :
*सर्वोत्कृष्ट १० कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)
*सर्वोत्कृष्ट १० कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)
*सर्वोत्कृष्ट १० चारोळी विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
* सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.
निकाल : 7 जुलै 2021
संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)
मो:9768065763.