मोती अनेक प्रकारचे असतात.पण त्याहीपेक्षा अनमोल आणि नि:शुल्क असे ' शब्दमोती ' आपणा प्रत्येकाकडेच आहेत .शब्दांमुळेच आपण एकमेकांशी संवाद करु शकतो,अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतो,विचारांचे आदान प्रदानही करु शकतो आणि अजून खूप काही करू शकतो.
शब्द ही आपणास मिळालेली एक अपूर्व देणगी आहे.
शब्दांमुळे भाषेचे सौंदर्य वाढते.त्याचबरोबर आपली योग्यता,प्रतिष्ठा,आपला चांगला-वाईटपणा इतरांच्या लक्षात येतो.
इतर मोत्यांप्रमाणेच शब्दांचेही चांगले,वाईट,कोमल,कठोर,कडू,गोड,खोचक असे अनेक प्रकार आहेत.
यातील काही शब्दांमुळे आपण एकमेकांच्या जवळ येवू शकतो तर कधी लांबही जावू शकतो.
आपण या शब्दमोतिंचा वापर योग्यप्रकारे केला तर आपण आपल्या जीवनात सदैव सुख,आनंद, यश मिळवू शकतो.
चला तर मग आपणही आपल्या साहित्य लेखणीद्वारे अनमोल अशा शब्दमोतिंचे योग्यप्रकारे वर्णन करू या.
साहित्य प्रकार: कविता .
साहित्य सादर करण्याचा कालावधी: 12 एप्रिल 2022.ते 10 मे 2022.
स्पर्धेचे नियम:
1.सदर स्पर्धा फक्त कवितांसाठी आहे.
2.कविता मराठीत सबमिट करता येतील.
3.सहभागींनी त्यांच्या मूळ कविता सादर केल्या पाहिजेत.
4.सहभाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
5.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.
6.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.
7.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.
8.स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.
9.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
10.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या कविता स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.
11.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
बक्षीस
⁃ सर्वोत्कृष्ट 10 कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)
⁃ सर्वोत्कृष्ट 50 कविता एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.
⁃ सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र व रु.100 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मेल द्वारे देण्यात येतील
निकाल : 5 जुन 2022.
संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)
मो:9768065763.