स्टोरीमिरर व वर्तमानपत्र पुरोगामी संदेश प्रस्तुत...
“साहित्य संकल्प”
(कथा-काव्य लेखन मासिक उपक्रम.)
storymirror.com या ऑनलाईन साहित्य व्यासपीठावर कथा-काव्य लेखन मासिक उपक्रम दिनांक - ३० जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. हा उपक्रम श्री. सुरेश डांगे सर. यांच्या https://www.purogamisandesh.in पुरोगामी पोर्टल व पुरोगामी साहित्य या ग्रुप अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येत आहे. तरी सर्व लेखकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा हे नम्र आव्हान !
उपक्रमाचे स्वरूप : “साहित्य संकल्प” ही स्पर्धा नसून हा साहित्य लेखन संकल्प आहे. या उपक्रमात सहभागी लेखकांनी सातत्य पूर्ण ३० दिवस साहित्य लेखन करणे अपेक्षित आहे. तसेच ३० दिवस अखंडित पणे लेखन करणाऱ्या लेखकांच्या साहित्याचे ई- पुस्तक संग्रह प्रकाशित करण्याचा आमचा मानस आहे.
नियम व अटी :
१.कथा,कविता मराठीत स्वीकारल्या जातील.
२.उपक्रमासाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.
३.सहभागींनी त्यांच्या स्वलिखित कथा,कविता,सादर केल्या पाहिजेत.
४.उपक्रमात सहभाग घेताना विषयाचे कोणतेही बंधन नाही. आपण आपल्या आवडत्या विषयावर साहित्य लिहू शकतात.
५.उपक्रमात एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाहीत.
पुरस्कार :
३० दिवस अखंडित पणे लेखन करणाऱ्या लेखकांच्या ३०(कथांचे किंवा कवितांचेच) साहित्याचे ई- पुस्तक संग्रह प्रकाशित करण्यात येईल व डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येतील.
(ई-मेल द्वारे)
टिप : ई- पुस्तक संग्रह स्टोरीमिररच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येईल.