STORYMIRROR

#थरारक भयकथा

SEE WINNERS

Share with friends

अंधाराचे दाट सावट.. सूनसान निर्जन रस्ता.. दुतर्फा उंचच उंच झाडांची वर्दळ.. पिंपळाच्या पानांची सळसळ..दिसेनासं झालेलं आभाळ.. ढगांचा गडगडाट.. विजांचा कडकडाट.. आणि रस्त्याच्या मधोमध लांबवर पसरलेली कुणाची तरी आगळी वेगळी सावली..

असं काही ऐकलं की कल्पनेत एखाद्या हॉरर मूव्हीचं दृश्य येऊन जात.

असेच भय घालणारे दृश्यलेखन व कथालेखनास वाव मिळवून देण्यासाठी तसेच नवनवीन कल्पना व संकल्पनांवर लेखन करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्व लेखकांसाठी स्टोरीमिरर घेऊन आली आहे *"थरारक भयकथा लेखन स्पर्धा*" जिथे तुम्ही तुमच्या कल्पनेतल्या अथवा वास्तवातल्या भयावह कथा सादर करू शकता!


कल्पनाशक्तीला व लेखनकौशल्यास धार देऊन भुतांच्या मनोरंजक कथा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी छोटेसे योगदान म्हणून मनोरंजना सोबतच समाजात जागृती घडवून आणणाऱ्या बोधकथा आपण सादर करू शकता.


नियम :

  1. भयकथा असणे आवश्यक
  2. कथा लिहत असताना काळी जादू, जादूटोणा व अंधश्रद्धेला खतपाणी मिळणार नाही याची काळजी घ्यावी.
  3. कथेमध्ये कोणताही धर्म किंवा समुदायाच्या भावना दुखावतील अशी कथा लिहू नये. आढळल्यास, स्पर्धेमधून डिलीट करण्यात येईल
  4. सहभागींनी आपली मूळ कथा सादर करावी. आपण कितीही कथा सादर करु शकता, त्याला मर्यादा नाही.
  5. संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.


बक्षीस


स्पर्धेमध्ये तीन सर्वोत्कृष्ट विजेते निवडले जातील.


* प्रथम क्रमांक: ट्रॉफी व डिजिटल विजेते प्रमाणपत्र.

* द्वितीय क्रमांक: ३०० रुपयाचे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर व डिजिटल विजेते प्रमाणपत्र.

* तृतीय क्रमांक: १५० रुपयाचे स्टोरीमिरर शॉप व्हाउचर व डिजिटल विजेते प्रमाणपत्र.


* सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येतील.


निकाल : ७ ऑगस्ट २०२३.


संपर्क: रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड)

मो : ९७६८०६५७६३.