स्टोरीमिरर व महासंग्राम साहित्य समूह आयोजित storymirror.com या ऑनलाईन व्यासपीठावर
" बोल अनुभवाचे "
कथा-कविता,चारोळी लेखन स्पर्धा दिनांक, १३ फेब्रुवारी ते १० मार्च २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
ही स्पर्धा संग्राम संतोष सलगर, यांच्या महासंग्राम साहित्य ग्रुप अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येत आहे.तरी सर्व लेखक,कवी स्पर्धकांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग घ्यावा.ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
आपल्या आयुष्यात सर्वांत मोठा गुरु हा अनुभव असतो तो आयुष्यात बरंच काही शिकवून जातो अशा प्रकारे आयुष्याच्या वळणावर घडलेले अनुभव या स्पर्धेच्या माध्यमातून कथा,कविता,चारोळी या साहित्य प्रकारात माडन्याची उत्कृष्ट संधी
स्पर्धेचे नियम -
१.कथा कविता,चारोळी मराठीत सबमिट करता येतील.
२.लेखकांनी त्यांचे मूळ लिखाण सबमिट करावे.
३.स्पर्धेसाठीच्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील,
४.सबमिट करण्यासाठी साहित्य संख्येचेही बंधन नाही.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.
५.संपादकांनी दिलेले गुण तसेच लाईक्स कमेंट्स आणि रेटींग्जद्वारे साहित्यावरील वाचकांची एंगेजमेंट यांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येईल.
६.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.
७.स्टोरी मिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
बक्षीसे
*सर्वोत्कृष्ट १० कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)
*सर्वोत्कृष्ट १० कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. (ई-मेल द्वारे)
* सर्वोत्कृष्ट ५० कविता,चारोळी एका ई-बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.
* सर्वोत्कृष्ट २० कथा एका ई बुक मध्ये प्रकाशित करण्यात येतील.
* सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र मेल द्वारे देण्यात येतील.
पात्रता
स्पर्धेचा कालावधी- १३ फेब्रुवारी ते १० मार्च २०२१
निकाल- ८ एप्रिल २०२१
भाषा- मराठी
संपर्क- रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)
मो: 9768065763.