STORYMIRROR

#स्री शक्ती 3

SEE WINNERS

Share with friends

जागतिक महिला दिना निमित्त  स्री शक्ती


फार पूर्वीपासून स्रीवर लादलेले चूल अन मूल सांभाळण्याचं कर्तव्य प्रत्येक स्री अत्यंत चोखपणे बजावत असून आज ती पुरुषांबरोबरच नाही तर त्याहीपेक्षा अधीक प्रमाणात सर्वच क्षेत्रांमधे उच्च पदावर कार्यरत आहे.तिच्यातील धैर्य,शौर्य,चातुर्य,कुशाग्र अन तल्लख बुध्दीमत्ता या सर्व गुणांचा चौकसपणे विचार विनिमय करून ती सदैव कर्तव्यदक्ष असते. 

घर संसार,अनेक छोट्या मोठ्या भूमिकांपासून ते देशाची पंतप्रधान,राष्ट्रपती पदापर्यंतच्या महान भुमिका ती मोठ्या कौशल्याने हाताळत असते.

' जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उध्दारी ' स्री एका क्षणाची पत्नी अन जन्माची माऊली ' या ओळी स्रिच्या ममते बद्दल,कर्तृत्वाबद्दल खूप काही सांगत असल्याचं सार्यांच्याच लक्षात येत असून ती आपल्या नात्यांना हवी तशी मायेची ऊब देवून नाती सांभाळत असल्याचंही समजतय.पण असं असुनही अलीकडे स्रियांवर होत असलेले अन्याय,अत्त्याचार, भ्रूणहत्त्या अशा घटनांबद्दल आपण दररोज ऐकतो,वाचतो.तर यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून आपण आपल्या साहित्य रचनेतून प्रबोधन करू या.

साहित्य प्रकार : कथा, कविता.

नियम :

1.स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकतो.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. शब्दांची कोणतीही मर्यादा नाही.

2.आपल्या रचनेत कोणत्याही आक्षेपार्ह किंवा अश्लील शब्दांचा वापर करु नका किंवा कोणत्याही धार्मिक समुदायाच्या भावना दुखावल्या जातील असे काहीही लिहू नका.

3.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.

4.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते नाकारले जाईल.

5.आपली कथा / कविता,स्वतः लिहिलेलीच असावी, कुठूनही कॉपी केलेली नसावी.

6.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.

7.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.

बक्षीस :               

सर्वोत्कृष्ट ५ कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व स्टोरीमिररकडून प्रकाशित झालेली तीन मराठी पुस्तके दिली जातील.

सर्वोत्कृष्ट ५ कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व स्टोरीमिरर कडून प्रकाशित झालेली तीन मराठी पुस्तके दिली जातील.

सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र व रु.१०० मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मेल द्वारे देण्यात येतील.

साहित्य रचना सादर करण्याचा कालावधी : दि.7 मार्च 2022 ते 5 एप्रिल 2022.

 निकाल : 3 मे 2022.

संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी विभाग प्रमुख ) मो: 9768065763.