स्टोरीमिरर आयोजित "आठवणीतील क्षण"
आयुष्यातील सुखद काळ म्हणजे निरागस बालपण जे हसत-खेळत जाते मनसोक्त पाहिजे तसं जगता येते खरच बालपण हे प्रत्येकाच्या जीवनातील सुंदरशी फुलाची कळी असते आणि ती नकळत उमलत राहते जीवनात आपण लहानाचे कधी मोठे होतो हे समजत देखील नाही थोडे मोठे झालो की आपल्या मध्ये समजस्य पण आपोआप येतो ते फुलासारखं बागडण हळूहळू बंद होऊन जातं आणि विचार काही गोष्टींचा मनात येऊ लागतात खरं जीवन काय असतं जीवन कसं असावं हे या वयात समजलं जातं कालांतराने जबाबदारी माणसावर पडते त्यावेळी सुख-दुःख मानवाला झेलावी लागतात या सुंदर जीवनाचा स्वाद घ्यावा लागतो जीवन हे खुप सुंदर आहे फक्त ते सुंदर विचाराने जगावे.
गुलाबाची कळी छान दिसते ती फुलल्या नंतर अधिकच सुंदर दिसते कालांतराने ते फुल सुकून गळून पडते तसेच माणसाचे जीवन आहे कधीतरी संपून जाणारे जीवनाच्या प्रवासात कसेही दिवस असो आपले जीवन आपण फुल गुलाबाच्या फुलाप्रमाणे फुलवून सुगंधित जगावे.
बालपणी चे ते रमनीय वातावरण, शाळेतील ते दिवस, मित्रासंगे खेळ खेळलेले प्रत्येक क्षण, कॉलेज मधील आसतांना आयुष्यात होणारे बद्दल, नवं नवीन मित्र मंडळी,त्याच बरोबर संवसारिक आयुष्य,चांगली वाईट वेळ.
अशा आपल्या जीवनप्रवासात येणारे कटू,गोड प्रसंग अनुभव आपल्या कथेतून काव्यातून आपण व्यक्त करु शकतो.
तर चला आपण आपल्या जीवनप्रवासातील घडलेले प्रसंग कथा व काव्यरूपात व्यक्त करून आपल्या आयुष्यातील आठवणींना उजाळा देऊया.
स्पर्धेचे नियम -
1.स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
2.सदर स्पर्धा फक्त कथा,कवितांसाठी आहे.
3.सहभागींनी त्यांच्या मूळ साहित्य सादर केल्या पाहिजेत. शब्दांचे बंधन नाही.
4.सहभागी स्पर्धक एकापेक्षा अधिक रचनादेखील सादर करु शकतात.
5.एखाद्या रचनेबाबत वाद उद्भवल्यास त्यासाठी संबंधित लेखकच जबाबदार असेल.
6.इतर कोणत्याही लेखकाचे लेखन कॉपी केल्याचे आढळल्यास ते स्टोरीमिरच्या पोर्टल वरून डिलिट करण्यात येईल.
7.स्पर्धेसाठी दिलेल्या लिंकवरून सबमिट केलेल्या प्रवेशिकाच ग्राह्य धरण्यात येतील.
8.संपादकीय गुणांच्या आधारे विजेत्यांचा निर्णय घेतला जाईल.
9.या स्पर्धेसाठी एकदा सबमिट केलेल्या साहित्य स्टोरीमिररच्या प्लॅटफॉर्मवरून काढून घेता येणार नाही.
10.स्टोरीमिरर ने घेतलेला निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल.
साहित्य प्रकार: कथा,कविता
साहित्य सादर करण्याचा कालावधी: 25 जुलै,ते 24 ऑगस्ट 2021.
बक्षीस
सर्वोत्कृष्ट 10 कविता विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. 200 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)
सर्वोत्कृष्ट 10 कथा विजेत्यांचे डिजिटल प्रमाणपत्र व रु. 200 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मिळेल. (ई-मेल द्वारे)
सर्व सहभागींना सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र व रु.100 मूल्याचे स्टोरीमिरर शॉपिंग व्हाऊचर मेल द्वारे देण्यात येतील.
निकाल : 14 सप्टेंबर 2021.
संपर्क : रोशन मस्के.(स्टोरीमिरर मराठी हेड.)
मो : 9768065763.